सभापतींना तातडीने दिल्लीत बोलाविले

0
61

सभापती डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने डॉ. सावंत यांना दिल्लीत पाचारण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नेतेपदासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य नावांमध्ये डॉ. सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. डॉ. सावंत केंद्रातील भाजप नेत्यांबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत माहितीसाठी डॉ. सावंत यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.