सचिनने घेतले आंध्रप्रदेशातील गाव दत्तक

0
75

मास्टर ब्लास्टर विक्रममादित्य फलंदाज तथा राज्यसभा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरचे काल रविवारी आंध्रप्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तेंडुलकरने ‘खासदार आदर्श ग्राम योजने’तर्ंगत हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. ११० कुटुंबे राहत असलेल्या या गावात अद्याप रस्त्याची आणि शौचालयाची सुविधा नाही. या गावात एकमेव शाळा असून तिथे ङ्गक्त पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाची लोकसंख्या पाच हजार असून तो तिरुपती लोकसभा क्षेत्रात येतो. इथला मुख्य व्यवयाय शेती आणि दूध उत्पादन आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास सचिन तेंडुलकर जेव्हा गावात आला तेव्हा रंगीबेरंगी कपडे घातलेल्या गावकर्‍यांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले.
यावेळी सचिनने येथील गावकर्‍यांशी संवाद साधला असता, लोकांनी गावातील समस्यांविषयी सचिनला माहिती दिली.