संयुक्त व्याघ्र प्रकल्प प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती

0
237

राज्यातील म्हादई अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि खोतीगाव अभयारण्यातील लोकवस्ती नसलेल्या, कमी लोकवस्तीचा समावेश असलेल्या भागात संयुक्त व्याघ्र प्रकल्प करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

देशात २०१४ मध्ये व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाने ३१ मार्च २०१६ रोजी गोव्यात व्याघ्र राखीव क्षेत्र उभारण्याची सूचना केली आहे. गोव्याचे वनक्षेत्र हे कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य संवर्धित भागांना जोडलेले आहे. त्यामुळे नेत्रावळी, म्हादई व इतर अभयारण्याचा व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

राज्य वन्य जीव मंडळाच्या १२ ऑक्टोबर २०१६ च्या बैठकीत या विषयावर पहिल्यांदा चर्चा करण्यात आली आहे. तसेच राज्य वन्य जीव मंडळाच्या १६ डिसेंबर २०१७ रोजी बैठकीत म्हादई, नेत्रावळी, भगवान महावीर अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान आणि खोतीगाव अभयारण्य अशा लोकवस्ती नसलेल्या किंवा कमी लोकवस्ती असलेल्या अभयारण्यांच्या क्षेत्राची व्याघ्र कोअर प्रकल्प म्हणून शिङ्गारस करावी, अशा एका प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे. तो प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत एका प्रश्‍नावरील लेखी उत्तरात दिली आहे.
लोकवस्ती जास्त असलेले भाग वरील अभयारण्यांच्या क्षेत्रातून वगळले आहेत.