संबित पात्रांनी ‘बीफ’वर भाष्य का केले नाही? ः कॉंग्रेस

0
93

गोमांसाच्या (बीफ) प्रश्‍नावर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असतानाही मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला सरकारच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी गोव्यात आलेले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी वरील प्रश्‍नावर कोणतेही भाष्य का केले नाही, असा प्रश्‍न प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी केला आहे.
आपले सरकार स्थापन झाल्यानंतर विदेशातून भारतीयांचा काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. त्यावरही पात्रा यांनी एक शब्दही काढला नाही. उलट गोव्यात येऊन कॉंग्रेसवर टीका केली, असे नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोमंतकीय जनतेने भाजपला कौल दिला नव्हता. भाजपने गोव्यात अनैतिक मार्गाने सरकार स्थापन केले असल्याचा दावा नाईक यांनी केला.