संपादित जमिनीचे पैसे शिरोडकरांना देण्यास स्थगिती

0
152

माजी आमदार तथा भाजपचे शिरोडा मतदारसंघातील उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या वेदांत रियल इस्टेट डेव्हलपर्स या कंपनीला ९.२४ कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काल दिला.

राज्य सरकारने शिरोडकर यांची शिरोडा येथील जमीन संपादित केली आहे. सरकारी अधिकार्‍यांनी निवडणूक आचारसंहितेच्या काळात जमीन संपादनाबाबतच्या रक्कमेतील ९.२४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. महसूल खात्याच्या सचिवांनी २७ मार्च २०१९ रोजी निवडणूक कार्यालयाला पत्र पाठवून शिरोडकर यांना निधी वितरित करण्यास परवानगी मागितली होती.

निवडणूक आचारसंहिता काळात शिरोडकर यांना ९.२४ कोटींचा निधी देण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरू असल्याने कॉंग्रेसचे प्रवक्ते रोहित डिसा यांनी यासंबंधी येथील निवडणूक कार्यालयाकडे तक्रार केली होती. येथील निवडणूक कार्यालयाने ११ एप्रिल रोजी सदर निधी वितरणाचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.