‘संजीवनी’बाबत सरकारकडून दिशाभूल

0
127

>> सुदिन ढवळीकर यांचा आरोप

राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
संजीवनी सहकारी साखर कारखाना कायमचा बंद करण्याचा डाव चालला आहे आणि त्यामुळेच सरकारकडून लपवाछपवी केली जात आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.

मडकई येथील पाणी समस्येची पाहणी करण्यासाठी सुदिन ढवळीकर आल्यानंतर ‘संजीवनी’ कारखान्याबाबत विचारले असता ढवळीकर म्हणाले, कारखान्याचे प्रशासक बंदची माहिती देतात, तर ऊस उत्पादकांचा रोष पाहून सरकार लगेच निर्णय फिरवते, यामागे सरकारची भूमिका लक्षात येत आहे.
सरकारने घेतलेला हा ‘यू टर्न’ असून, हे नेमके कशासाठी चालले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.