संजीता चानू डोपिंगमुक्त

0
111

>> मिळणार २०१८चा अर्जुन पुरस्कार

राष्ट्रकूल स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविलेली भारताची स्टार वेटलिफ्टर संजीता चानू डोपिंगच्या आरोपांमधून मुक्त झाली आहे. त्यामुळे तिला २०१८सालीचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. संजीता चानू २०१८साली डोपिंगमध्ये दोषी आढळली होती.
त्यापूर्वी तिने २०१७ साली अर्जुन पुरस्कासाठी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत तिला २०१८सालीच्या पुरस्कारासाठी विचार करून तिचे नाव सिलबंद लिफाफ्यात बंद करून देण्याचा आदेश क्रीडामंत्रालयाला दिला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने तिला दोषमुक्त केले. परिणामी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार तिचा अर्जुन पुरस्कार तिला देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्राने दिली आहे.