संजय दत्तच्या लवकर तुरुंगमुक्तीचा निर्णय योग्यच

0
78

>> मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्त याला तुरुंगातून लवकर मुक्त करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य होता असा निर्वाळा काल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

वरील प्रकरणी तुरुंगवास भोगणार्‍या संजय दत्तची तुरुंगातून आठ महिने लवकर मुक्तता करण्यात आली होती. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल न्या.. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने याप्रकरणीची गृह खात्याच्या निर्णयाबाबतची सर्व कागदपत्रे सादर केली. त्यावरून संजय दत्तला तुरुंगातून लवकर सोडताना कोणताही भेदभाव झालेला नाही हे सिध्द झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे संजय दत्तला लवकर सोडण्यात आले.
गृृहमंत्रालयाने सादर केलेली कागदपत्रे व राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणात आम्हाला कोणताही विरोधाभास आढळलेला नाही.