संगणकक्रांतीने घडले परिवर्तन

0
137

फार पूर्वीपासून रोटी-कपडा-मकान ह्या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या गेल्या आहेत. बदलत्या काळानुसार ह्यामध्ये जरा भर घालून बिजली-बँडविड्‌थ ह्या दोन बाबींचाही समावेश केला गेला पाहिजे.
आजघडीला आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत, पण सगळेच चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे, परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये ङ्गार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युुनिकेशन टेक्नॉलॉजी- आयसीटी) सर्वात आघाडीवर आहे. ह्यामुळे, पूर्वी असलेले, अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्वप्रकारची माहिती मिळू शकते, तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये ङ्गार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. ह्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युुनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी)) सर्वांत आघाडीवर आहे. ह्यामुळे, पूर्वी असलेले, अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्वप्रकारची माहिती मिळू शकते. तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. आज ह्या संवादासाठी आपणांस ङ्गक्त संगणकावरच अवलंबून राहावे लागत नाही. खरे तर सेलफोन आजचा ङ्गिरता संगणक बनला असून सेलफोनमार्ङ्गत आपण अनेक गोष्टी स्वस्तात सहजपणे आणि आपल्या पसंतीच्या ठिकाणाहून करू शकतो. भारतात आपण ह्या क्षेत्रामध्ये होणारी ङ्गार मोठी परिवर्तने पाहात आहोत. आज आपल्याकडे ५ कोटी सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा ३ ते ४ लाखांनी वाढते आहे. संगणकाच्या किंमती कमी होत असल्याने त्याही क्षेत्रात आपणांस विलक्षण वाढ दिसणार आहे. माहिती आणि परस्पर संवादाच्या देवाणघेवाणीत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ह्या साधनांमुळे एक नवीच इ-जीवनशैली निर्माण होणार आहे. कोणत्याही विषयाची माहिती तर घरबसल्या मिळेलच, परंतु त्याबरोबरच इतर अनेक सेवासुविधा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जगभरात कधीही, कोठेही उपलब्ध होऊ लागतील. दुकानात न जाता खरेदी आणि बँकेत न जाता पैशाचे व्यवहार करणे ह्यामध्ये विशेष असे काहीच राहणार नाही.
जगाला विविध प्रकारची सॉफ्टेवेअर्स इतर संबंधीच्या इतर सेवा पुरवण्यामध्ये भारत कायमच आघाडीवर राहिला आहे. परंतु आता ह्या साधनांचा वापर आपल्या देशासाठी आणि देशामध्येच होण्याचे प्रमाण वाढते आहे. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. ह्या रूपाने पृथ्वीवर पुनः एकदा आईस एज अवतरली आहे असे म्हणता येईल. बोललेल्या शब्दांचे मजकुरात तर मजकुराचे आवाजात रूपांतर करणे शक्य झाल्याने आणि यंत्रांची भाषांतरक्षमता वाढल्याने ह्या क्षेत्रात असंख्य नवीन संधी तर उपलब्ध होतीलच, परंतु अधिक महत्त्वाचे म्हणजे लाखो निरक्षर व्यक्तींना ह्या तंत्रज्ञानाचा ङ्गायदा मिळेल. आज, निदान शहरी भागातल्या बहुसंख्य नागरिकांना, संगणकाशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सुक्ष्मरूपामुळे (नॅनोटेक्नॉलॉजी), संगणकाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये मिसळलेल्या सर्वसमावेशक आणि एकात्मिक रूपात तो दिसू लागला आहे. (म्हणजे पूर्वी आपल्याकडे रेडिओ, डीव्हीडी प्लेअर, टेपरेकॉर्डर अशी वेगवेगळी साधने असायची नंतर त्यांची जागा ऑल-इन-वनने घेतली कारण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तूंचा आकार आटोपशीर बनला आणि त्यांची कार्यक्षमता वाढली. तसेच इथेही होत आहे नेहमीच्या वापरातल्या मोबाईल फोनचे उदाहरण घ्या. हँडसेटमधून मिळणार्‍या सुविधांची संख्या किती वेगाने वाढत चालली आहे आणि त्यांची किंमत किती वेगाने घसरते आहे हे लक्षात घेता माझा मुद्दा सहजपणे स्पष्ट होतो.) असे म्हटले जाते की येत्या काही वर्षांतच आपल्याकडे कार, मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्ड ह्या तीन वस्तू असल्या की इतर कोणतीही वस्तू अथवा सेवासुविधा खरेदी करणे, तिच्यापर्यंत पोहोचणे, ती वापरणे आणि तिचे शुल्क भरणे ह्यांसारख्या कामांसाठी इतर कोणत्याही माध्यमावर किंवा व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता अशी बरीचशी कामे ऑनलाईन होऊ घातल्याने येत्या ङ्गक्त दहा ते वीस वर्षांमध्ये आपणांस कल्पनाही करता येणार नाही इतक्या बाबी संगणकाद्वारे हाताळल्या जाणार आहेत. कळङ्गलक आणि माऊसचा वापर खूपच कमी होऊन स्पर्शाने (टच-स्क्रिन), आवाजाद्वारे किंवा हातांच्या हालचालीने आज्ञा स्वीकारणारे संगणक वापरले जातील. संगणक आपणांस विविध कामांची (म्हणजे त्याने करून उरलेल्या कामांची!) आठवण करून देईल, आपणांस हवी ती माहिती ङ्गटाङ्गट काढून देईल (आत्ताही देतच आहे), आपल्या आरोग्याची काळजी घेईल, आपल्या तसेच आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देईल, विविध ठिकाणी आपली ओळख पटवेल (आधार ह्या यू आय डी कार्डचे उदाहरण घ्या), आपली सर्वप्रकारे करमणूक करेल – फार काय आपली स्वप्ने देखील रेकॉर्ड करून सवडीने ती आपणांस दाखवेल!
अपंग तसेच आजारी व्यक्तींना संगणकाच्या ह्या सूक्ष्मरूपांचा ङ्गार मोठा फायदा मिळेल कारण संगणक आणि शरीरशास्त्र ह्यांचा संयोग असलेल्या बायोइन्फर्मेटिक्स ह्या शाखेचा विस्तार होईल आणि शरीरांतर्गत नॅनोबोट्‌स उर्ङ्ग नॅनो-रोबोट्‌सचा वापर सुरू होईल. ह्यामुळे (पुराणकाळातील सुरस आणि चमत्कारिक कथांप्रमाणे) अक्षरशः पाहण्याची किंवा ऐकण्याची क्षमता कमी असलेल्यांना दिसू शकेल, ऐकू येईल आणि मूक व्यक्तींना वाचा ङ्गुटेल! प्रगत युरोपीय देशात हे (मर्यादित प्रमाणात का होईना) ह्याआधीच घडले आहे
ज्ञानावरून आठवले. शिक्षण आणि ते देण्या-घेण्याच्या संकल्पनांमध्ये संगणकीय क्रांतीमुळे ङ्गार मोठा ङ्गरक पडेल. विद्यापीठाची विचार आणि व्यवस्थापन पद्धती बदलेल आणि कदाचित सायबर विद्यापीठेही निर्माण होतील. स्वयंसेवा संस्थांना ह्या तंत्रक्रांतीचा मोठा लाभ होईल. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत न जाता शिक्षण घेणे सोपे होईल आणि मुख्य म्हणजे ते साचेबंद, कंटाळवाणे न वाटता हसतखेळत घेता येईल. व्यक्तिगत तर सोडाच, परंतु औद्योगिक, समााजिक आणि सार्वजनिक पातळीवर संगणकाच्या ह्या विविध अवतारांचे अत्यंत क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम होतील. अनेक पारंपरिक संकल्पना मोडीत निघून नव्या पद्धती चटकन रूळतील. इन लाईन चे रूपांतर ऑनलाईन व्हायला थोडा वेळ लागेल पण ते होणार हे नक्की. इंटरनेटचे जाळे आजच्या कित्येक पटींनी पसरेल आणि त्याचा ङ्गायदा ग्रामीण, गरीब व दुर्गम भागांत राहणार्‍या कोट्यवधी नागरिकांना होईल. शहरी वा साधारण सुस्थापित भागात राहून बर्‍यापैकी आर्थिक पातळीवरचे जीवन जगणार्‍यांना खेड्यापाड्यात आणि वाड्यावस्त्यांमध्ये होऊ घातलेल्या ह्या क्रांतीची सुस्पष्ट कल्पना येणे खरोखरच कठीण आहे. हाताशी सर्व तांत्रिक उपकरणे असलेल्या शहरवासियांच्याही आयुष्यात इ. शासनासारख्या सुविधेमुळे ङ्गरक पडतो आहे. तिथे सर्वथा अभावग्रस्त जीवन जगणार्‍यांची काय कथा! आता तर सौरऊर्जेवर चालणारे संगणक येऊ घातले आहेत. त्यामुळे वीजटंचाई देखील ह्या तंत्रक्रांतीला थोपवू शकणार नाही!
वशशरिज्ञऽवशशरिज्ञीहळज्ञर्रीिीी.लेा
(डॉ. दीपक शिकारपूर तंत्र उद्योजक, लेखक व सभासद आय टी टास्क फोर्स (महाराष्ट्र राज्य) म्हणून कार्यरत आहेत.)