श्रीलंका अंतिम फेरीत

0
76
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना श्रीलंका संघाचा शतकवीर फलंदाज के. सिल्व्हा.

पणजी (क्री. प्र.)
के. सिल्व्हाचे शतक आणि चंदना देसप्रिया ६६ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर जोरावर श्रीलंकेने इंग्लंडला एफतर्फी लढतीत १० गड्यांनी नमवित पर्वरी येथील जीसीएच्या मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या दृष्टिहीनांच्या टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी होणार्‍या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेचा सामना यजमान भारताविरुद्ध होणार आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मात्र खेळाच्या मध्यावर त्यांनी वेग घेतला. पीटर ब्लूईट्टचे (५४) अर्धशतक, सग (४९) आणि इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या मौल्यवान योगदानाच्या जोरावर २० षटकांमध्ये ७ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली.
जिंकण्यासाठी १८० धावांचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेच्या फलंदाजांनी हे आव्हान अगदी सहजरित्या पेलले आणि एकही फलंदाज न गमावता श्रीलंकेच्या संघाने विजय मिळविला. के सिल्व्हाने गोव्यामध्ये सुरु असलेल्या या त्रिकोणीय मालिकेमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याने नाबाद १०४ धावा केल्या. त्याला चांगली साथ देताना चंदना देसप्रियाने ६६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.