शेवटी इफ्फीतील कट्‌ट्यावर आलिया आलीच नाही!

0
116

काल सोमवारी इप्फीच्या कट्‌ट्यावर लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट रात्री ८ वा. येणार म्हणून हजारोंच्या संख्येने तिच्या चाहत्यांनी, सिनेरसिकांनी एकच गदी केली होती. सात वाजल्याच्या आधीपासूनच तिथे गर्दी व्हायला सुरूवात झाली होती. आलिया येणार आणि तिचे मोबाईलमधील कॅमेर्‍यात छायाचित्र टिपाणार म्हणून सर्वजण उत्सुक होते.

मीडियावालेही त्यावेळी आपले कॅमेरे सरसावून सज्ज झाले होते. एवढे दिवस दिसत नव्हता पण काल सोमवारी तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. अशावेळी आठ वाजून गेल्यानंतर आयोजकांनी घोषणा केली की, अभिनेत्री आलिया भट आली आणि गाडीतून उतरायला तिला जागाच नाही म्हणून तशीच परतून गेली. हे उत्तर अर्थात न पटणारे होते. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हजारो रसिकांना मात्र हिरमोड झाला आणि कट्‌ट्यावरील समारोप मात्र रसिकांचा विरस करून गेला.