शीला दीक्षित यांच्याकडून राज्यपालपदाच्या राजीनाम्याचे संकेत

0
144

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर युपीएच्या काळातील काही राज्यपालांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी राजीनाम्याबाबत संकेत दिले आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या केरळमध्ये असून तिरुअनंतपूरम येथील पद्मनाभस्वामी मंदिराला त्यांनी भेट दिली असता श्रीमती दीक्षित त्यांच्यासोबत होत्या. त्यावेळी त्यांनी राजीनाम्याबाबत संकेत दिल्याचे वृत्त आहे. आपण पद्मनाभस्वामींच्या इच्छेनुसार काय ते करणार असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. आपण कोणालाही घाबरत नाही आणि आपली सद्सद्विवेकबुद्धीही अगदी स्वच्छ आहे असे त्यांनी सांगितले. मंगळूर ते तिरुअनंतपूरम या विमानप्रवासातही दीक्षित राष्ट्रपतींसमवेत होत्या. आपण या दरम्यान राष्ट्रपतींशी अनेक विषयांवर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. आपण अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंग यांची कोणत्या कारणावरून भेट घेतली त्याविषयी भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.