शीख समाज पीडीपीलाच मतदान करेल

0
89

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत शीख समाज पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीलाच (पीडीपी) मतदान करणारे असल्याचे ऑल पार्टीज शिख को आर्डिनेशन कमिटीने काल येथे स्पष्ट केले. जातीय पातळीवर या राज्यात दुही निर्माण करू दिली जाणार नाही असेही वरील संघटनेने सांगितले. राज्यात शीख समाजाला नॅशनल कॉन्फरन्स व कॉंग्रेसच्या सरकारांनी भेदभावाची वागणूक दिल्याचेही संघटनेने सांगितले. शीख समाजाची मते मागण्याचा नैतिक अधिक या दोन्ही पक्षांना नसल्याचे या संघटनेचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना यांनी म्हटले आहे.