शिष्टमंडळाच्या पदरी निराशा

0
78

>> आम आदमी पक्षाची टीका

राज्यातील खाण व्यवसाय प्रश्‍नी दिल्लीत गेलेल्या भाजप आघाडी सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदरी निराशा पडली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत काल केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खाण व्यवसाय १६ मार्च २०१८ पासून बंद होणार आहे. खाण व्यवसाय बंद पडल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्‍नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, या शिष्टमंडळाला केंद्रीय पातळीवरून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही, असा दावा आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक एल्विस गोम्स यांनी केला. राज्यातील खाण व्यवसाय कायद्यानुसार चालावा, या भूमिकेवर आम आदमी पार्टी ठाम आहे. सरकारने खाण व्यवसायातून लुटल्यात आलेले कोट्यवधी रुपये वसूल करावे, अशी मागणी गोम्स यांनी केली.

गोव्याच्या म्हादईच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोणी दिला? असा प्रश्‍न गोम्स यांनी उपस्थित केला. कॉँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या पक्षाचे राज्य सरकार मोठा निर्णय घेत नाहीत. हायकमांडकडून निर्णय लादले जातात, असा आरोप गोम्स यांनी केला.