शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद

0
149

>> कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ३ साठी नवीन मार्गदर्शक सूचना काल जाहीर केल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. व्यायामशाळा, योग इन्स्टिट्यूट यांना ५ ऑगस्टपासून सुरू करण्यास मान्यता दिली जाणार आहे. रात्रीच्या वेळी फिरण्यावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. फक्त, कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

व्यायामशाळा, योग इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सामाजिक अंतर नियमांचे पालन आणि कोविड फैलाव रोखण्यासाठी खास मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सामाजिक अंतर आणि आरोग्य प्रॉटोकोलचे पालन करून आयोजित करण्यास मान्यता देण्यास आली आहे. यासंबंधीच्या सूचना २१ जुलै २०२० रोजी करण्यात आलेल्या आहेत.
राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत मिशनखाली आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला मान्यता दिली जाणार आहे.

मेट्रो रेल, सिनेमागृहे, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स, बार, ऑडिटोरियम बंद ठेवले जाणार आहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी कायम आहे.
कंटेनमेंट झोनची जिल्ह्याच्या वेबसाइटवर अधिसूचित करण्याची सूचना करण्यात आली आहे. मनुष्य, सामानाच्या आंतरराज्य वाहतुकीवर निर्बंध असता कामा नये. आंतरराज्य प्रवासासाठी वेगळी मान्यता, ई-पास घेण्याची गरज नाही, असे सूचनेत म्हटले आहे.

अनलॉक ३ मध्ये मेट्रो, थिएटर्स स्विमिंग पूल, बार, सभागृहे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम, मनोरंजन पार्क बंद राहतील.