शालान्त मंडळाचे रामकृष्ण सामंत अध्यक्ष

0
118

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शिक्षण खात्याचे उपसंचालक रामकृष्ण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामंत आज सकाळी पदभार स्वीकारणार आहेत.

या मंडळाचे अध्यक्ष रिबेलो यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०१७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त होते. मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता ताबा शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. सरकारने शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ. उदय गावकर यांची निवड केल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता ताबा गावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. सरकारने मंडळाच्या अध्यक्षपदी सामंत यांची नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे. चार वर्षांसाठी सामंत यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण खात्याच्या नियोजन विभागाच्या उपसंचालकपदी सामंत कार्यरत होते. सामंत यांनी शिक्षण खात्यात रुजू होण्यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे.