शारापोवाची आगेकूच

0
114

पाचवेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या मारिया शारापोवाने पिछाडीवरून मुसंडी मारत शेनझेन ओपन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या ऍलिसन रिस्के हिचा ३-६, ६-४, ६-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना सुमारे अडीच तास चालला. शारापोवाने ३४ विजयी फटके लगावताना ११ बिनतोड सर्व्हिसेस केल्या. जागतिक क्रमवारीत ५९व्या स्थानावरील शारापोवाने दहापैकी ७ ब्रेक पॉईंट्‌स देखील वाचवले. अंतिम आठमध्ये तिचा सामना कझाकस्तानच्या झरीना दियास हिच्याशी होणार आहे. फ्रेंच ओपन विजेत्या येलेना ओस्टापेंको हिला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. द्वितीय मानांकन लाभलेल्या ओस्टापेंकोला झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने ६-१, ६-४ असे एक तास २० मिनिटांत गारद केले.