शशिकलांनी आमदारांना उपस्थित केले पत्रकारांसमोर

0
72

अभाअद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांन काल आपल्या समर्थक आमदारांना पत्रकारांसमोर उपस्थित करून आमदारांना लपवून ठेवण्यात आल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. बंडखोर व विरोधक या अनुषंगाने खोट्या बातम्या पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आपले आमदार मुक्त असून त्यामुळे आपला पक्ष व सरकारही भक्कम असल्याचा दावा यावेळी शशिकला यांनी केला. त्यांच्या गटाचे आमदार राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीच्या निवाड्यावर प्रतिक्रिया विचारली असता थांबा व पहा असे उत्तर त्यांनी दिले.
सध्या रिसॉर्टमध्ये असलेले आपल्या गटाचे आमदार त्यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारा संपर्कात आहेत. त्यांच्यावर कोणाचाच दबाव नाही हे प्रत्यक्ष तुम्ही पहा असे पत्रकारांना त्या
म्हणाल्या.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या प्रतीक्षेत राज्यपाल विद्यासागर राव आहेत असे पत्रकारांनी सांगितले. त्यावेळी ‘राजभवनमधून त्या विषयी इन्कार करण्यात आला आह’ असे शशिकला यांनी
सुनावले.
तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अद्याप निर्णय न घेतल्यामुळे आपला संयम ढळत असल्याचे शशिकला यांनी म्हटले होते. जर राज्यपालांनी लवकर निर्णय घेतला नाही तर आपले आमदार वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवतील असे त्यांनी म्हटले होते.