शशांक मनोहर पुन्हा आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध

0
124

भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. आणखी पुढील दोन वर्षे ते या पदावर कार्यरत राहतील.
यापूर्वी २०१६ साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती. यंदाही या पदासाठी केवळ शशांक मनोहर यांचे एकमेव नाव आले होते आणि ऑडिट समितीचे अध्यक्ष एडवर्ड क्विनलॅन यांनी मनोहर हे बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले.

पुन्हा एकदा पुढील दोन वर्षांसाठी आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना मनोहर यांनी हा आपल्यासाठी एकप्रकराचा सन्मानच असल्याचे सांगितले. आपल्या नावाला पाठिंबा देणार्‍या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले व पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी १०१६साली दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. काही आश्वासने पूर्णत्वासही आणल्याचे त्यांनी सांगितले. आयसीसीच्या धोरणांमधून क्रिकेटचा प्रसार जगभर व्हावा हाच आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.