शरद यादवांच्या अपात्रतेसाठी खलबते

0
98

जदयू तथा संयुक्त जनता दलाचे नाराज राज्यसभा खासदार शरद यादव यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी सध्या डावपेच सुरू असल्याचे वृत्त आहे.
बिहारमधील महायुतीतील घटक असलेल्या जदयूने या युतीला तोडून भाजपच्या पाठिंब्याने नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार घडविल्याने शरद यादव नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली असल्याने त्यांना खासदारपदापासून अपात्र ठरवण्याचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे प्रयत्न आहेत.
शरद यादव यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे आल्यानंतर ते यावर निर्णय घेऊ शकतात. या अनुषंगाने जदयू व भाजप यांच्या कायदा सल्लागारांची खलबते सुरू असल्याचे वृत्त आहे. यादव संबंधित कोणत्या कलमाखाली अपात्र ठरू शकतात याविषयी काल संध्याकाळी उशिरा ही खलबते सुरू होती. स्वतः नीतिशकुमार यांना या विषयाचा निकाल या महिन्यातच झालेला हवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.