शब्दांतून कळे भावना

0
188
  • चित्रा क्षीरसागर

त्या ङ्गांदीवर चार- पाच पांढरी शुभ्र ङ्गुलं मला दिसली, माझं मन मला खायला लागलं, आपण या बिचार्‍या वेलीला वांझोटी म्हटले ही गोष्ट माझ्यासारखी मोगरीच्या मनालाही लागली असेल का..?

शब्द हे शस्त्र असते ते जपून वापरा, असे आमच्या पूर्वसूरींनी सांगून ठेवलंय. शब्द माणसं जोडतात. चार माणसांत बसवतात व चार माणसांतून उठवतातही. शब्दांचे आपल्यावर खूप ऋण असते. आपण आपल्या भावना मग त्या कोणत्याही असो त्या व्यक्त करताना आपण शब्दांचा आधार घेतो. संत तुकाराम महाराज म्हणतात.

‘आम्हा घरी धन | शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे | यत्न करू ॥

याही पुढे अनेकांनी शब्दांची महती कथन केली आहे. माणसामाणसांतील जवळीक वा दुरावा वाढविण्याचे काम हे शब्द चपखलपणे करतात. माणसंच काय झाडा पेडांनाही या शब्दांच्या भावना कळतात आणि हो प्राण्यांनाही त्या समजतात.
शब्दांवरून मला दोन प्रसंग आठवतात, ते सांगते.

आमच्या घराच्या (फ्लॅट) बाल्कनीत खूप वर्षांपासूनच्या वेली आहेत. काही ङ्गळझाडं आहेत पण न ङ्गळणारी.. ङ्गुलांचीही तर्‍हेतर्‍हेची झाडं वेली आहेत. त्यांना रोज पाणी देणे, त्यांच्या कुंड्यातील माती काढून खत घालणे, अधूनमधून खत घालणे. त्यांच्या अनावश्यक ङ्गांद्या तोडून टाकणे इत्यादी…

या वेलीमध्ये एक गोकर्णीचा वेल आणि एक मोगरीचा वेल आहे. हा अनुभव मोगरीबाबतचाच आहे. माझ्या यजमानांनी त्यांच्या कार्यालयाच्या भोवती असलेल्या बागेतून मोगरीचा एक ङ्गाटा आणून माझ्या हातात दिला. कारण मला ङ्गुलझाडांची ङ्गारच आवड. जाई, जुई, मोगरी, अनंताचा वेल मला खूप आवडतो. मोगरी रुजावी, तिची वेल भरभरून वाढावी असं सतत वाटायचं. त्यामुळं यांनी आणलेला ङ्गाटा मी कुंडीत लावला. तो वाढला तर बाल्कनीची ग्रील हिरवीगार होईल. मोगरीला ङ्गुलं येतील व माझं घरंही सुगंधित होईल, असं मला वाटायचं. मोगरा ङ्गुलला आणि त्याचा वेलू गगनावरी गेला असं स्वप्न मी रंगवत होते. अरे अशा ङ्गोङ्गावणार्‍या वेली कुंडीत लागत नसतात, असं यांच्या मित्रानं सांगितलं होतं. तरीही पाहूया काय होतं ते. आमची श्रद्धा व मेहनतीचं ङ्गळं म्हणून तरी मोगरी रुजेल असा मनात विश्वास होता. म्हणून तो ङ्गाटा कुंडीत रोवला. तो महिनाही चैत्राचाच होता. आम्ही ङ्गाटा लावला. त्याला चांगली माती घातली. नियमित खत पाणी सुरूच होतं. वेल तर रुजली. (मित्राचं म्हणणं खोटं ठरवून.) ती चांगलीच पसरली बाल्कनीच्या ग्रील भरून. टवटवीत पण होती. ग्रिलवरची हिरवी पाने पाहून मन प्रसन्न व्हायचे. मनाचाही मोगरा ङ्गुलायचा.

एक वर्ष झालं. पण वेल नुसती वाढतंच होती कुंडीत ती वाढत होती पण ङ्गुलत नव्हती. बघता बघता दुसरं वर्षही संपलं. तीन चार वर्षे गेली. पण मोगरी नुसतीच वाढायची. तिला ङ्गुलं काही येईनात. खूप तळमळ चालली माझ्या जिवाची. ही मोगरी ङ्गुलं का देत नाही, असं मनात वाटायचं. नंतर पुन्हा कामात मन रमायचं. मोगरीचा विसर पडायचा.

एके दिवशी धुणं वाळत घालण्यासाठी बाल्कनीत आले. धुतलेले कपडे बादलीत घालून ते पिळून वाळत घालू लागले. माझं लक्ष मोगरीकडं गेलं. अजून नुसतीच वाढतेय मेली. ङ्गुल काही देत नाही. वांझोटीच दिसतेय की… असे अपशब्द माझ्या तोंडून निघून गेले. काही क्षणानंतर माझं मलाच वाईट वाटलं. एक तर ती ङ्गुलत नाही आणि आपण तिला वांझोटी म्हणालो. वांझोटी हा शब्द तिला वापरायला नको होता असं सारखं वाटायला लागलं. मनातल्या मनात मी तिची माङ्गी मागितली. नंतर मी ती घटना विसरूनही गेले.

जवळ जवळ दहा बारा दिवस होऊन गेले या गोष्टीला. पुन्हा धुणं वाळत घालायला मी बाल्कनीत आले. धुणं वाळत घालता घालता अकस्मात माझ्या हातात एक सुगंधित पांढरं ङ्गुल येऊन पडलं. सहज वर लक्षं गेलं. वेल मला हसते आहे तिच्या सुगंधित पांढर्‍या ङ्गुलांतून असं वाटून गेलं. माझ्या मनाला इतका आनंद झाला की, मी वेलीकडं कुतूहलानं बघतंच राहिले. त्या ङ्गांदीवर चार-पाच पांढरी शुभ्र ङ्गुलं मला दिसली. माझं मन मला खायला लागलं… आपण या बिचार्‍या वेलीला वांझोटी म्हटले ही गोष्ट माझ्यासारखी मोगरीच्या मनालाही लागली असेल का.. असं वाटून ती झुरू लागली व निसर्गाने तिच्यावर कृपा केली व ती ङ्गुलली. आपलं अस्तित्व ङ्गळतं ङ्गुलतं आहे, असं माझं समाधान करण्यासाठी तर तिनं हे ङ्गुल माझ्या हातात टाकलं नाही नां. तू एक आई आहेस, बाई आहेस, मग बाईचं सुख-दुःख तुला कळत आणि सलत नाही का, असंच ती विचारतेय असं वाटू लागलं. मलाही आई बनण्याचं भाग्य निसर्गानं दिलं आहे, असंच जणू ती सांगत होती.

दुसरा अनुभव असा की, आमच्या घरी खूप वर्षांपासून आम्ही मांजरं पाळलेली आहेत. त्यांना झालेल्या पिल्लांत मांजरीही असतात व बोकेही. आमच्या घरातील भुरकट रंगाचा बोका अतिशय देखणा व मोहक होता. त्याला पाहिलं की उचलूनच घ्यावसं वाटायचं. त्याची ऐटदार चाल मनाला भुरळ पाडायची. त्याचे डोळे काहीतरी सांगताहेत असं वाटायचं. तो इतका हुशार की काही विचारू नका. त्याला बिस्किटं आवडायची. आम्ही बिस्किटांचे पुडे डब्यात ठेवतो. बिस्किटाच्या डब्याचं झाकण जरा जरी वाजलं तरी त्याचे कान टवकारायचे. तो आवाज बरोबर ओळखायचा. कुणाकडं काय मागायचं हेही त्याला कळायचं. एका डब्यात बिस्किटं, एकात शेव असे चार पाच डबे वेगवेगळे होते. तिथंच डाळ-तांदळाचे डबेही होते. डब्यांच्या झाकणाचा आवाज तो ओळखत असे. झाकणाच्या आवाजावरून तो ओळखायचा मी काय खायला देणार ते.
आमचं घर रस्त्यालगत आहे. तेथे पाववाला (पोदेर), मासेवाला, कबाडीवाला, आईस्क्रीम- कुल्ङ्गीवाला हॉर्न वाजवत येतात. मासेवाल्याचा हॉर्न कोणता हे त्याला नेमकं कळतं. मासेवाल्याचा हॉर्न वाजला की पठ्‌ठ्या धावतच तळमजल्यावर जायचा. आपल्याला दूध कोण देतं, कोण मासे घेऊन देतं, कोण पोळी देतं हे त्याला नेमकं समजायचं. तो मग त्या त्या व्यक्तीच्या म्हणजे मी, माझे पती व माझी मुलं यांच्याकडे हट्ट धरायचा.