शनिवारच्या पावसानंतर राज्यात उकाडा वाढला

0
126

राज्यातील काही भागात शनिवारी रात्री पावसाचा शिडकावा झाल्यानंतर राज्यात उष्णतेच्या प्रमाणात आणखीन वाढ झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. पावसाच्या शिडकाव काही भागात होऊ शकतो, असे हवामान विभागाने कळविले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील हवामानात बदल झाला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक भागात पावसाची शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शनिवारी रात्री पावसाचा शिडकावा झाल्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला नाही. उलट, उष्णतेच्या प्रमाणात आणखीन वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८ अंश सेल्सियल नोंद झाले आहे.