शंभर रुपयांत मिळणार १० भाज्या

0
115

>> शेतकर्‍यांच्या गटाच्या उपक्रमाचा कृषी मंत्र्यांहस्ते शुभारंभ

राज्यातील १३ शेतकर्‍यांच्या एका गटाने लोकांना केवळ १०० रुपयात दहा भाज्या देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून काल पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यानी या उपक्रमाचा शुभारंभ केला.

या उपक्रमाखाली १०० रुपयांत ग्राहकांना एक किलो कांदा, अर्धा किलो बटाटे, एक किलो टॉमेटो, गोमंतकीय तांबडी भाजीची एक जुडी, अर्धा किलो अन्य प्रकारची भाजी, ४ लिंबू, पाव किलो गाजर, पाव किलो काकडी, ओली कोथंबीर एक जुडी, २०० ग्राम हिरव्या मिरच्या आदी मिळणार आहे.

या भाज्या उद्या फोंडा येथे लोकांना उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर राज्यभरातील ग्राहकांना या १० प्रकारच्या भाज्या १०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शेतकर्‍यांच्या गटातील एक सदस्य मंगेश खेडेकर यांनी या योजनेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोमंतकीय भाज्यांवर भर द्या ः कवळेकर
या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना कृषीमंत्री कवळेकर यानी या शेतकर्‍यांना ग्राहकांना १०० रुपयात दहा प्रकारच्या भाज्या देताना जास्तीत जास्त गोमंतकीय भाज्या देण्याचा सल्ला दिला. गोव्यातील ग्रामीण भागांत कित्येक प्रकारच्या भाज्या पिकत असून या भाज्या शेतकर्‍यांकडून खरेदी करून त्यांची वरील योजनेखाली विक्री करावी, असा सल्ला त्यांनी त्यांना दिला. विक्रीसाठी परराज्यातील भाज्या स्वतः आणण्यापेक्षा फलोत्पादन महामंडळाकडून खरेदी कराव्या, अशी सूचनाही त्यानी या शेतकर्‍यांना केली.

१०० रुपयात दहा भाज्यांसाठीचे फोंडा – मनोज गांवकर ९४२१२४९२०६, काणकोण – अजित पै – ९८५०४१४११८, मडगाव – रतीश तारी – ९४२०७६८९५९, सावर्डे – शलाका शेट तेली – ७०६६१८५२३९, वास्को – अनिरुद्ध केणी – ८६०८४०५४००, माशेल – हर्षद भोसले – ८९९९०४७४९०, पणजी – मंगेश खेडेकर – ८४१२९८०१११, पर्वरी – दिलीप नेरूलकर – ८७९६४८४४९४, म्हापसा – विवेक सावंत – ७९७२९७८६८०, पेडणे – रुपेश नाईक – ९६३७७२५१७६, डिचोली – सखाराम पेडणेकर – ९६०४७२२७९२, साखळी – अजित देसाई – ८६६८७८२६५१, वाळपई – कृष्णा गांवकर – ९८३४४८७१४० हे समन्वयक आहेत.