व्हायसी मनोराकडून सीएसएम ताळगावचा धुव्वा

0
103

>> जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग

ईमामसाच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर यूथ क्लब ऑफ मनोराने क्लब सां मिगेल दी ताळगावचा ६-० असा धुव्वा उडवित जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग स्पर्धेत पूर्ण गुणांची कमाई केली.

सिरसई मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजयी यूथ क्लब ऑफ मनोराने सर्व सहाही गोल पहिल्या सत्रातच नोंंदविले होते. व्हायसी मनोराने सामन्याच्या प्रारंभी पहिल्याच मिनिटाला ईमामसाबने नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. २३व्या मिनिटाला रेनसन फर्नांडिसने संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ईमामसाबने ३८व्या मिनिटाला व्हायसी मनोराला ३-० अशा आघाडीवर नेले. तर ४०व्या मिनिटाला ईमामसाबने आपली हॅट्‌ट्रिक साधली व ४३व्या मिनिटाला त्याने व्हायसी मनोराचा चौथा गोल नोंदविला. मायरन फर्नांडिसने ४५+२व्या मिनिटाला व्हायसी मनोराचा सहावा गोल नांेंेदविला. ईमामसाबची सामनावीर पुरस्कारासाठी निवड केली.