वॉनकडून आर्चरचा बचाव

0
123

इंग्लंडच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दोषारोपांचे सत्र सुरू झाले आहे. यजमानांच्या या पराभवानंतर माजी कसोटीपटू मायकल वॉन याने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा बचाव केला आहे.
वेगवान गोलंदाजांना सातत्याने ताशी ९० मैल वेगाने गोलंदाजी करणे कठीण असल्याचे सांगत वॉन याने आर्चरची बाजू घेतली आहे. विंडीजचा माजी जलदगती गोलंदाज टिनो बेस्ट याने मात्र आर्चरवर सडकून टीका केली आहे.

मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ऍशेस मालिकेनंतर आर्चरचा वेग मंदावल्याचे बेस्ट याने म्हटले आहे. अनुभवी ब्रॉडच्या जागी आपल्याला कशासाठी निवडले आहे हे आर्चरने जाणायला हवे, असे बेस्ट म्हणाला होता. वॉन याने मात्र आर्चरच्या लयीमुळे आपण प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. आर्चरला सातत्याने ताशी ९० मैल वेगाने गोलंदाजी करता आली नसली तरी दुसर्‍या डावातील त्याची दिशा व टप्पा अचूक होता, असे वॉन याला वाटते.