वेस्ट इंडीज सर्वबाद ३१८

0
133

>> ब्रेथवेट, डावरिच यांची अर्धशतके; स्टोक्सचे ४ बळी

क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी आपल्या पहिल्या डावात ११४ धावांची आघाडी मिळविली. विंडीजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. प्रथमच संघाचे नेतृत्व करणार्‍या कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ बळी मिळविले. विंडीजने इंग्लंडला पहिल्या डावात २०४ धावांवर रोखले होते.

विंडीजने दुसर्‍या दिवसाच्या १ बाद ५७ धावांवर पुढे खेळण्यास सुरुवात केली व त्यांचा पहिलला डाव १०२ षट्‌कांत ३१८ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने काल संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने काल शाय होपच्या साथीत ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डॉम बेसने ही जमलेली जोडी फोडली. त्याने शाय होपला (१६) कर्णधार स्टोक्सकरवी झेलबाद केले. ६ चौकारांच्या सहाय्याने ६५ धावांची आकर्षक अर्धशतकी खेळी केल्यानंतर क्रेग ब्रेथवेट स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. शामराह ब्र्रुक्सने ३९, रॉस्टन चेसने ४७ तर जेर्माईन ब्लॅकवूड १२ धावा जोडून तंबूत परतले. त्यानंतर शेन डावरिचने ८ चौकारांच्या सहाय्याने ६१ धावांची दमदार अर्धशतकी खेळी करून संघाला तीनेशच्या पार नेले. स्टोक्सने त्याला यष्ट्यांमागे जोस बटलरकरवी झेलबाद केले. कर्णधार जेसन होल्डरला ५, अल्झारी जोझेपला १८ तर शेनॉन गॅब्रियलला ४ धावा जोडता आल्या.
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सच्या ४ बळींव्यतिरिक्त जेम्स अँडरसनने ३, डॉम बेसने २ तर मार्क वूडने १ बळी मिळविला.

धावफलक
इंग्लंड, पहिला डाव ः सर्वबाद २०४,
वेस्ट इंडीज, पहिला डाव ः क्रेग ब्राथवेट पायचित गो. बेन स्टोक्स ६५, जॉन कँपबेल पायचित गो. जेम्स अँडरसन २८ , शाय होप झे. बेन स्टोक्स गो. डोम बेस१६, शमराह ब्रूक्स झे. जॉस बटलर गो. जेम्स अँडरसन ३९ , रोस्टन चेज पायचित जेम्स अँडरसन ४७, जर्मेइन ब्लॅकवूड झे. जेम्स अँडरसन गो. डोम बेस १२, शेन डावरिच झे. जो़फ्रा आर्चर गो. बेन स्टोक्स ६१, जेसन होल्डर झे. जोफ्रा आर्चर गो.बेन स्टोक्स ५, अल्झारी जोसेफ त्रिफळाचित बेन स्टोक्स १८, कॅमर रोच नाबाद १, शॅनॉन ग्रॅबियल त्रिफळा मार्क वूड ४. अवांतर : २२. एकूण १०२ षट्‌कांत सर्वबाद ३१८. , गोलंदाजी ः जेम्स अँडरसन २५/११/२६/३, जोफ्रा आर्चर २२/३/६१/०, मार्क वूड २२/२/७१/१, बेन स्टोक्स०१४/५/४९/९, डोम बेस १९/५/५१/२.