वेध भविष्यातील तंत्रज्ञानाचा

0
349

– रामराव वाघ

मागील काही वर्षांमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या फरच आहारी गेलो आहोत. याला मुख्यत्वे मोबाईल स्मार्टफोन व संगणकाचा वाढता वापर कारणीभूत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपण अनेक गोष्टी सहजरीत्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा हा वाढता वेग पाहिला व वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्याचा वापर पाहिला तर भविष्यात आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता दिसून येते. 

मागील काही वर्षांमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या फरच आहारी गेलो आहोत. याला मुख्यत्वे मोबाईल स्मार्टन व संगणकाचा वाढता वापर कारणीभूत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपण अनेक गोष्टी सहजरीत्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा हा वाढता वेग पाहिला व वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्याचा वापर पाहिला तर भविष्यात आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता दिसून येते.

येणार्‍या काळामध्ये आपल्या अवतीभवती व एकंदर जीवनावर तंत्रज्ञानाचा ङ्गार मोठा परिणाम होणार आहे. हे बदल कोणते हे आपण बघू.
१. स्वायत्त वाहने ः
जगभरात प्रत्येक वर्षी १.२ दशलक्ष लोक ऑटोमोबाइल अपघातांत मरतात. परंतु स्वायत्त वाहने (एव्ही) लवकरच स्वतःपासून आम्हाला वाचविण्यासाठी येत आहेत. ९१.५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपघातांचे मानवी त्रुटीमुळे नुकसान झाले आहे. ‘टेस्ला’ कंपनीच्या स्वयंचलित वाहनांचा वापर आता लोक करू लागले आहेत. पण त्यांनादेखील अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अडचण टाळण्यासाठी ‘एव्ही’ काय करू शकते? अपघात घडण्याच्या काही क्षण अगोदर ‘एव्ही’ नाट्यमय आणि पूर्णतः गैरमानवीय मार्गांनी होणारा अपघात टाळू शकणार आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मानव वाहने हाकणार नाही तर आरामात आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी A‘एव्ही’चा वापर करणार आहे.
२. ‘बिग डेटा’च्या द्वारे अचूक निदान व औषधे ः
आतापर्यंत औषधोपचाराच्या क्षेत्रामध्ये सर्वाना एकाच प्रकारचे औषध देण्यात येते. पण आता रुग्णाच्या तसेच इतर माहितीच्या आधारे प्रत्येक रुग्णासाठी एकाच रोगावर वेगवेगळ्या मात्रांचे औषध देण्यात मदत होणार आहे.
उदाहरणार्थ, प्रिसिजन मेडिसिन क्षेत्रातील एक नेता णउडऋ (युनिव्हर्सिटी ऑङ्ग कॅलिङ्गोर्निया, सॅन ङ्ग्रान्सिस्को) आजारपणाचे निदान व उपचार करताना त्यांचा सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक संदर्भ समजून घेण्यासाठी त्यांच्या रुग्णांसोबत वेगवेगळ्या संभाषणांसाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देत आहे. प्रिसिजन औषध, लक्षणे आणि रोगाच्या यंत्रणा समजून घेण्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते.
३. सहभागी स्थाने ः
आम्हाला कार्य व मनोरंजन तसेच दैनंदिन कामासाठी घर, कार्यालयसारख्या स्थानांची गरज लागते. आपल्या कार्यानुरूप आपण त्या जाग्यावर सोयीसुविधा उपलब्ध करतो, जेणेकरून आपण आपले काम पार पाडू शकू. पण यापुढे हीच जागा आपल्या कार्यानुरूप स्वतःहून तेथील सामानाची व व्यवस्थेची फेररचना करून तुमच्या कामामध्ये सहभागी होऊन मदत करेल.
आरोग्यसेवेमध्ये याचा उपयोग कसा होईल ते पहा- रुग्णालये खोलीतील रचनेत बदल करतील, माहिती अद्ययावत करतील आणि त्या-त्या रुग्णाला पाहिजे तेवढा प्रकाश व आवाजाची पातळी मर्यादित करतील. हे रुग्णांची सध्याची ताण-पातळी, तीव्रता, वेळापत्रके, वैयक्तिक जीवनशैली आणि ङ्गिटनेस डेटावर आधारित असेल. याचा उपयोग रुग्णांसाठी चांगले आरोग्यपरिणाम आणि रुग्णालयाचा खर्च कमी करण्यासाठी होईल.
४. यंत्राद्वारे सर्जनशील निर्मिती ः
आपण संगीत तसेच चित्रपट व इतर सर्जनशील क्षेत्रांमध्ये यंत्रांचा वापर करतो. पण आता संपूर्ण नवीन संगीत, एवढेच नव्हे तर एखादा चित्रपटदेखील मानवी हस्तक्षेपाशिवाय बनवण्याची क्षमता संगणकामध्ये आली आहे व उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ होणार आहे. ‘सोनी’ कंपनीने हल्लीच असे एक गाणे ‘ऊरववूी उरी’ संगणकाद्वारे निर्मित केले व नंतर त्याच्यावर मानवी संस्कार केले. एवढेच नव्हे, तर ‘र्डीपीिीळपस’ हा संगणकनिर्मित चित्रपट यावर्षी लंडन चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित केला गेला. याचा अर्थ, काही काळानंतर यंत्रनिर्मित संगीत व चित्रपट सर्वाधिक खतासाठी व ‘ऑस्कर’सारख्या नामांकनासाठी मानवाशी स्पर्धा करणार आहेत.
५. सिंथेटिक फूड आणि सेल्युलर शेती मुख्य प्रवाहात ः
जागतिक स्तरावर आज ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी दबाव वाढत आहे. त्याचबरोबर हवामान बदल, अहिंसक मार्गाने अन्ननिर्मिती इत्यादी विषयांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे जनावरांचा वापर टाळून अन्ननिर्मिती करण्यात येईल. झाडापासून अन्नघटक काढून त्यांना जनावरांपासून तयार केलेल्या अन्नाची चव देण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये मांस, अंडी व दुग्धपदार्थ तयार करण्यात येणार आहेत.
६. व्यावसायिक बॉट्‌स ः
इंटरनेट बॉट्‌स, स्वयंचलित सॉफ्टवेअरसारख्या सुविधा आता ग्राहकसेवेसाठी चॅटसारख्या सेवा पुरवीत आहेत. पण लवकरच हे बॉट्स एखादे संपूर्ण किचकट कामदेखील सहजरीत्या करू शकतील.
७. व्हर्च्युअल रिऍलिटी थेरपीज् ः
‘व्हीआरटी’चा वापर आता ङ्गक्त मेंदूला सद्यस्थितीपासून विचलित करण्यासाठी होतो. पण लवकरच ‘व्हीआरटी’चा उपयोग करून औषधांच्या आवाक्याबाहेरील परिणामकारक पद्धती वापरून, मानवी मेंदूमधील मनोवैज्ञानिक दोष दूर करण्यात येतील.
८. सागरी शेती ः
जसजशी जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे तसतशी मानवाला अधिक शेतीसाठी जागा व पाण्याची निकड भासू लागली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आता सागरावर लक्ष केंद्रित होत आहे. आता सागराच्या पृष्टभागावर तसेच तळाशी भातशेती व मत्स्यशेती करणे शक्य होणार आहे.
९. ध्वनीआधारित संवाद ः
१९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून मानवी संगणक संवाद प्राथमिकदृष्ट्या ग्राङ्गिकल यूजर इंटरङ्गेसद्वारे (जीयूआय) केली जात आहे. पण स्क्रीनमुळे डोळ्यांवर येणारा ताण व दृष्टिदोष तसेच वाहनांना हाकण्यासाठी लागणार्‍या यंत्रणा यासाठी आता ध्वनीआधारित संवादक्षमता प्राप्त असलेल्या संगणकाची निर्मित होणारी आहे.
१०. नागरिकांच्या सेवेसाठी ड्रोन ः
वांडा देश जगामधील पहिला ड्रोन विमानतळ बांधत आहे. त्याचा वापर करून नागरिकांसाठी त्वरित औषध पुरवठा करण्याचा त्यांचा मानस आहे. ड्रोनद्वारे अनेक सामाजिक संघटना मानवी मदत करण्यासाठी किङ्गायतशीर मार्गाचा अवलंब करत आहेत.
११. अतिप्रचंड माहितीचे पृथकरण ः
आज कुठल्याही वास्तूविषयी माहिती गोळा करणे सोपी गोष्ट आहे. पण त्याचे पृथकरण करणे तेवढी सोपी गोष्ट नाही. येणार्‍या काळामध्ये तेदेखील ङ्गारच सोपे काम होणार आहे. त्यामुळे हवामान अंदाज, वाहतूक वर्दळ व्यवस्थापन, लोकसंख्या मापनसारख्या गोष्टी शक्य होणार आहेत.
१२. स्मार्ट इमारती
स्मार्ट शहरेही आता प्रत्यक्षात येत आहेत. या शहरांमध्ये असणार्‍या वास्तूदेखील स्मार्ट असल्या पाहिजेत. ऊर्जेचा कमीत कमी वापर करून त्याची बचत करण्यासाठी तसेच आतील तापमान थंड ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट इमारती तयार होत आहेत.
१३. व्हीआर-ऑन-डिमांड (मागणीनुसार आभासी जग) ः
व्हीआरद्वारे आपण महागड्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांना ङ्गाटा देऊन स्वस्त दरामध्ये आपणाला हवा तो कार्यक्रम घरबसल्या अनुभवू शकणार आहोत. व्हीआर कार्यक्रमांची तिकिटे विकण्याची शक्कल मनोरंजन कंपन्या काढत आहेत. या आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक स्वतःला वास्तुसापेक्ष माध्यमाद्वारे भूतकाळ व भविष्यकाळाकडे बघू शकणार आहे.
१४. सॉफ्ट रोबोटिक्सचा उदय
रोबोट म्हटला की आपल्या डोळ्यांपुढे टणक धातूचा बनवलेला प्राणी तसेच क्लिष्ट हालचाली येतात. पण येणार्‍या काळामध्ये निर्माण होणारे रोबोट मानवाशी साम्य असणारे होणार आहेत. सौम्य प्रकृतीचे हे रोबोट मानवाबरोबर सहकार्य करून त्याला वाहन चालवण्यास मदत करणे, अभ्यास करण्यासाठी मदत, एवढेच नव्हे तर एखाद्या सर्जनशील उपक्रमामध्येदेखील सहकार्य करतील.
१५. मशीन लर्निंग ः
वरील सर्व बदलासाठी अत्यंत आवश्यक असणारे तंत्रज्ञान म्हणजे मशीन लर्निंग. संगणक जेव्हा स्वतःहून माहितीचे विश्लेषण करून शिकायला लागतो व त्याचा वापर करून निर्णय घेतो त्याला ‘मशीन लर्निंग’ म्हणतात.