वीजमंत्री काब्रालांचे ‘ते’ वक्तव्य निराधार

0
64

पणजी (न. प्र.)
राज्यात मुख्यमंत्रिपदी नव्या नेत्याची निवड होण्यासंबंधीचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी जे वक्तव्य केलेले आहे, ते त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केले असल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी कधीही म्हटले नव्हते. सदर वृत्त हे खोटे व निराधार आहे, असा खुलासा भाजपने केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारातील घटक पक्ष असलेल्या मगो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अनुक्रमे सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच भावी डावपेचांवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला बोलावले होते. गोव्यात स्थिर सरकार देण्यासाठी काय करता येईल यावर शहा यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचे पक्षाने प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष युतीच्या धर्माचे पालन करण्यास बांधील आहे. तसेच युतीच्या घटकांची मानहानी होईल असे काहीही करू इच्छित नसल्याचे या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.