विश्‍वजित – कॉंग्रेस समर्थकांत वाद

0
125

वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिस्क – उसगाव येथे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र, निवडणूक अधिकारी व पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण ठेवल्यात यश मिळविले. पार-उसगाव मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बिघडल्याने मतदान सव्वातास उशीरा सुरू झाले.
धावशिरे, उसगाव येथील मतदान केंद्राजवळ मोठ्या संख्येने येत असलेल्या मतदारांना आकर्षिक करण्यासाठी भाजपची एक महिला कार्यकर्ती मतदारांना कुपन देत असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आढळून आले. यावेळी भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे तिथे पोहचताच कॉंग्रेस कार्यकर्ते व राणे यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी विश्‍वजित राणे यांनी निवडणूक अधिकार्‍यांशी चर्चा करून त्या महिलेला घरी पाठविले. कॉंग्रेस कार्यकर्ते व विश्‍वजित राणे यांच्यात वाद सुरू झाल्याचे कळताच परिसरात लोकांची गर्दी उसळली होती.
पार-उसगाव येथे मतदान यंत्रात बिघाड
दरम्यान, पार – उसगाव येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्र सकाळीच बिघडले. त्यानंतर सुमारे सव्वा तासानंतर मतदानाला सुरूवात झाली. सकाळपासून उसगाव भागात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली.