विविध क्षेत्रांत सहकार्याचे पोर्तुगाल सरकारचे आश्‍वासन

0
105

>> पोर्तुगाल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

 

पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनिओ कॉस्ता यांच्या बरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी पर्यटन, विज्ञान, भाषा, वारसा व सागरी क्षेत्रात एकमेकांना कशा प्रकारे मदत करणे शक्य आहे यावर काल चर्चा झाली. यावेळी मूळ गोमंतकीय असलेले पोर्तुगालचे पंतप्रधान कॉस्ता यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. वरील बैठकीत उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझा यांनीही भाग घेतला होता.
पोर्तुगालने समान नागरी कायद्याच्या रुपाने गोव्याला मोठी बक्षिसी दिली आहे. गोव्यातच हा कायदा असून देशभरात त्याची प्रशंसाही होते, असे उद्गार पार्सेकर यांनी यावेळी काढले. भारताला युनायटेड नेशनचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी पोर्तुगालने मदत केल्याचे पार्सेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. जवळजवळ पाचशे वर्षांपासून पोर्तुगालकडे संबंध असून गोवा मुक्त झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे पोर्तुगालकडे असलेल्या संबंधांचा वेगवेगळ्या क्षेत्राच्या विकासासाठी फायदा करून घेणे शक्य आहे, असेही पार्सेकर यांनी सांगितले.
पंतप्रधान कॉस्ता यांनी दिल्लीत काही करारांवर सह्या केल्या आहेत. गोव्यात ते केवळ विश्रांतीसाठीच आले होते. पोर्तुगालने ४५० वर्षे गोव्यावर राज्य केले. आता मूळ गोमंतकीय पोर्तुगालवर राज्य करीत आहेत याचा अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे विशेष भाष्य करणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कॉस्ता यांनी काल मंगेशी, जुने गोवे या पर्यटनस्थळांना भेट दिली. दरम्यान, कॉस्ता यांच्या गोवा भेटीमुळे पोलीस मुख्यालय, आदिलशहा पॅलेस, मिनेझिस ब्रागांझा अशा महत्त्वाच्या भागातील परिसराची साङ्गसङ्गाई करण्यात आली आहे.