विविधोपयोगी ‘फ्रिगेट’

0
136

– अनंत जोशी

आजच्या युगात जवळजवळ सर्वच आधुनिक ‘ङ्ग्रिगेट’ बचावात्मक किंवा मारक अशी क्षेपणास्त्रे आपल्या भात्यात ठेवतात. समुद्रावरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांत बर्‍याच सुधारणा करण्यात आल्यामुळे अशा फ्रिगेटची भूमिका आणखी वेगळ्या स्वरुपात दिसू लागली आहे.

आजच्या युगात जवळजवळ सर्वच आधुनिक ‘फ्रिगेट’ बचावात्मक किंवा मारक अशी क्षेपणास्त्रे आपल्या भात्यात ठेवतात. समुद्रावरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांत बर्‍याच सुधारणा करण्यात आल्यामुळे अशा ङ्ग्रिगेटची भूमिका आणखी वेगळ्या स्वरुपात दिसू लागली आहे. ती आता गाभ्यातील युद्धनौकेची भूमिका बजावू लागली आहे.
ब्रिटिश नौसेनेच्या ‘सलीसबरी’ श्रेणीतील ङ्ग्रिगेटवर विमानांचा मागोवा घेणारी यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यामुळे त्याला ‘एअर डायरेक्शन फ्रिगेट’ असे संबोधले जाऊ लागले. पण एका बाजूने ‘लेपर्ड’ श्रेणीतील जहाजाशी तुलना करता दारूगोळ्यामध्ये कपात करण्यात आली.
बहुविध काम करणार्‍या ‘मेको २००’, ‘अन्झाक’ व ‘हलीङ्गक्स’ श्रेणीतील फ्रिगेटची अशा नौसेनेसाठी निर्मिती करण्यात आली ज्यांना एकाच फ्रिगेटद्वारे विविधपयोगी कामे करण्याची मुभा मिळावी, जिथे पारंपरिक फ्रिगेट नाकाम होत होत्या.
हल्लीच्या आधुनिक तंत्रानुसार आताच्या ङ्ग्रिगेट आराखड्यात महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. त्यातील महत्त्वाची घडामोड म्हणजे रडारवर न टिपता येणारी जहाजे. फ्रिगेटची ठेवण किंवा आकार याबाबत अशा तर्‍हेने तिची योजना व आराखडा बनविण्यात आला की रडारने पाठविलेले संकेत हे कमी प्रमाणात परावर्तीत केले जातील. तसाच याचा दुसरा ङ्गायदा असा होता की त्याचा वेग व चपळता ही पूर्वीच्या जहाजांपेक्षा सरस आहे.
याबाबतची उदाहरणे द्यायची झाल्यास ङ्ग्रेंच नौसेनेचे ‘ला ङ्गायेत्त’ श्रेणीतील फ्रिगेट, ज्यात ‘अस्तेर १५’ ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात होती. जर्मन ‘एङ्ग १२५’ व ‘सच्सेन’ श्रेणीतील फ्रिगेट, एमके ४१ नी सज्ज ‘टर्किश टीएङ्ग २०००’ श्रेणी, भारतीय नौसेनेचे ‘शिवालिक’ व ‘तलवार’ श्रेणीतील फ्रिगेट, ज्यावर वेगाने जाणारी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे तैनात आहेत.
आताची आधुनिक ङ्ग्रेंच नौसेना पहिल्या वर्गाची, व दुसर्‍या वर्गाची फ्रिगेट असे आपल्या ताफ्यातील सेवेतील विद्ध्वंसिका व फ्रिगेट यांना संबोधिले जाते. त्यात आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या विद्ध्वंसिका आहेत त्यांना ‘डी’ हे अक्षर जोडले जात तसे. फ्रिगेटसाठी ‘एङ्ग’ हे आद्याक्षर लावलं जातं. हे तसं भ्रमात घालण्यासाठी पुरेसं आहे. कारण जगातील काही नौसेना यासारख्या जहाजांना वेगळ्या नावांनी संबोधतात.
जर्मनीच्या नौसेनेत जुन्या विद्ध्वंसिकाच्या जागेवर नवीन फ्रिगेटची तैनाती करण्यात आली. पण त्यांचा आकारमान व भूमिका त्यांच्यात काही कमी नव्हतं. आकाराने त्या मोठ्याच म्हणजे ७,५०० टनी होत्या. या जगातील सर्वात मोठ्या फ्रिगेट होय. हेच सर्व स्पेनच्या नौसेनेने केले. हे सर्व देशांच्या तुलनेत अग्रेसर होते.
समुद्रकिनारी लढू शकणारी फ्रिगेट
काही नवीन श्रेणीतील जहाजे ही कॉर्वेटसारखीच होती. पण त्यांच्या वेगात तसेच आयुधे लादण्यात बदल करून ती अशी बनविण्यात आली. पण त्यांची निर्मिती आपल्या समवर्गीय जहाजांशी लढाई न करता लहान जहाजांबरोबर लढाई करण्यासाठी केली गेली. ‘लीटोरोल कॉम्बट शीप’ (एलसीएस) हे एक चांगले उदाहरण आहे. २०१५ च्या मध्यापर्यंत अमेरिकन नौसेनेने पेर्री श्रेणीतील सर्व नौका सेवेतून निवृत्त केल्या व त्या ठिकाणी एलसीएसची रवानगी केली. या नौका फ्रिगेटपेक्षा लहान होत्या, पण त्यावर असणारा दारुगोळा हा तेवढाच असून त्यावर लागणारे मनुष्यबळ अर्ध्याहून कमी आहे. त्यांचा वेगही प्रचंड म्हणजे जवळपास ताशी ७४ कि.मी. आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना अनेक कार्य करण्यासाठी केली गेली, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या कारणास्तव मोहिमेवर पाठवता येईल, तसेच त्याचा भरपूर उपयोग करता येईल अशी त्याची रचना केली आहे. अमेरिका सध्या अशा नौकांची भरमार करत आहे, जेणेकरून सर्व फ्रिगेटना सेवामुक्त करता येईल.