विल्सन गुदिन्होंचा जामीन अर्ज हायकोर्टानेही फेटाळला

0
156

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मेरशीचे पंच सदस्य प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणातील संशयित विल्सन गुदिन्हो यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळला आहे.

प्रकाश नाईक यांचा १७ जानेवारी २०२० रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांची बहीण अक्षया नाईक यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विल्सन गुदिन्हो व ताहीर या दोघांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जात आहे. या प्रकरणातील संशयित विल्सन गुदिन्हो यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती.

संशयित विल्सन गुदिन्हो यानी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मयत प्रकाश यांची बहीण गोवेकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. प्रकाश नाईक याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणात आणखी काही व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सुनावणीच्या वेळी दिली होती.