विल्यमसन, बोल्टला विश्रांती

0
109

>> टिम साऊथीकडे न्यूझीलंड टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व

श्रीलंकेेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसन व अनुभवी जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती दिली आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टिम साऊथी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट यष्टिरक्षक टिम सायफर्ट याच्यासह मिचेल सेंटनर, टॉड ऍस्टल व ईश सोधी या तीन तज्ज्ञ फिरकीपटूंचा या संघात समावेश आहे.

चार दिवसीय सामन्यांच्या प्लंकेट शिल्ड स्पर्धेत सायफर्टला दुखापत झाली होती. त्यामुळे विश्‍वचषकातील संघात त्याला जागा मिळाली नव्हती. सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाचा स्फोटक फलंदाज टॉम ब्रुसदेखील संघात परतला होता. सुपर स्मॅश टी-ट्वेंटी स्पर्धेत ११ डावांत १५७.५८च्या स्ट्राईकरेटने ३५३ धावा केल्यामुळे त्याला राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू डग ब्रेसवेल याला बाहेर बसविण्यात आले आहे. त्याची जागा सेथ रेन्स याने घेतली आहे. वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलेन व अष्टपैलू डॅरेल मिचेल यांनी आपले स्थान राखले आहे. तिन्ही टी-ट्वेंटी सामने पल्लेकेले येथे खेळविले जाणार असून पहिला सामना १ सप्टेंबरला होणार आहे.

न्यूझीलंड संघ ः टिम साऊथी, टॉड ऍस्टल, टॉम ब्रुस, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुगलेन, डॅरेल मिचेल, कॉलिन मन्रो, सेथ रेन्स, मिचेल सेंटनर, टिम सायफर्ट, ईश सोधी व रॉस टेलर.