विराट कोहली माझा आदर्श ः सॅमसन

0
132

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू समॅसनने कर्णधार विराट कोहलीची भरभरून स्तुती करताना तो त्याच्यासाठी आणि देशातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी आदर्श असल्याचे सांगितले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराकडून युवा खेळाडू बरेच काही शिकू शकतील असे सॅमसन म्हणाला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर आयपीएलमध्येही सरस खेळ करीत संजूने भारतीय संघात स्थान मिळविले आहे. महंेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून तो अग्रगण्य उमेदवार आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सॅमनने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्या अलीकडील कारभाराविषयी चर्चा केली. कर्णधार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघातील युवा खेळाडूंना कधीच दबावाखाली नेले नाही, त्याबद्दल यांचे कौतुक केले. कोहली आणि शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममधील उर्जा सातत्याने उच्च स्तरावर ठेवल्याचेही सॅमसन म्हणाला.

गेल्या काही महिन्यात आपण कर्णधार कोहलीकडून बरेच काही शिकलो आहे. तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.
तो ज्या प्रकारे स्वत: ची काळजी घेतो, त्याचे पोषण कसे करतो, प्रशिक्षण घेतो ते पाहिल्यास तो माझ्यासाठी आणि प्रत्येकासाठी एक आदर्श आहे, असे २५ वर्षीय सॅमसन म्हणाला.