विराटचे शतक; भारताचा विजयी शुभारंभ

0
66
India's batsman Virat Kohli celebrates after scoring a century (100 runs) during the first One Day International (ODI) cricket match between South Africa and India at Kingsmead Cricket Ground on February 1, 2018 in Durban. / AFP PHOTO / ANESH DEBIKY

>> रहाणे, कुलदीप चमकले; दक्षिण आफ्रिकेवर ६ गड्यांनी मात

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि त्याने अजिंक्य रहाणेसमवेत (७९) केलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ६ गड्यांनी मात करीत ५ लढतींच्या वन-डे मालिकेत विजयी शुभारंभ करीत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेले २७० धावांचे विजयी लक्ष्य भारतीय संघाने ४५.३ षट्‌कात ४ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. रोहित शर्मा (२०) आणि शिखर धवन (३५) हे दोघे शिलेदार तंबूत परतल्यानंतर २ बाद ६७ अशा धावसंख्येवरून खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतला कर्णधार विराट कोहलीने १० चौकारांच्या सहाय्याने ११२ धांवांची शतकी खेळी करीत संघाचा विजय साकारला. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी १८९ धावा जोडल्या. भारत विजयासमिप पोहचला असताना रहाणे ५ चौकार व २ षट्‌कारांनिशी ७९ धावांचे योगदान देऊन आंदिले पेहलुक्वायोच्या गोलंदाजीवर इम्रान ताहिरकडे झेल देऊन परतला. लगेच कर्णधार कोहलीही पेहलुक्वायो गोलंदाजीवर बाद झाला. अखेर हार्दिक पांड्या (नाबाद ३) आणि महेंद्रसिंह धोनी (नाबाद ४) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कर्णधार फाफ डुप्लेसिसचे शतक आणि तळातल्या ख्रिस मॉरिस (३७) आणि फेलुक्वायो (२७) यांनी अंतिम हाणामारीच्या षटकांमध्ये केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर, पहिल्या वन-डे सामन्यात आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २७० धावांचे आव्हान ठेवले. डुप्लसिस, मॉरिस, फेलुक्वायो आणि क्वींटन दी कॉक (३४) यांच्याव्यतिरिक्त भारतीय फिरकीच्या अचूक गोलंदाजीपुढे अन्य फलंदाजांचे फारसे न चालल्याने दक्षिण आफ्रिेकेला ८ गडी गमावत २६९ अशी धावसंख्या उभारता आली. डुप्लेसिसने आपल्या ११२ चेंडूतील १२० धावांच्या शतकी खेळीत ११ चौकार व २ षट्‌कार खेचले. त्यांच्या आक्रमक खेळीमुळे एकवेळ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करीत असलेल्या दक्षिण आफ्रिक संघाला युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीने रोख लावली.

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः क्वींटन दी कॉक पायचित युजवेंद्र चहल ३४, हाशिम आमला पायचित जसप्रीत बुमराह १६, फाफ डुप्लेसिस झे. हार्दिक पंड्या गो. भुवनेश्वर कुमार १२०, आयदेन मारक्रम झे. हार्दिक पंड्या गो. युजवेंद्र चहल ९, जेपी ड्यमिनी त्रिफळाचित गो. कुलदीप यादव १२, डेव्हिड मिरल झे. विराट कोहली गो. कुलदीप यादव ७, ख्रिस मॉरिस त्रिफळाचित कुलदीप यादव ७, ख्रिस मॉरिस त्रिफळाचित कुलदीप यादव ३७, आंदिले पेहलुक्वायो नाबाद २७, कासिगो रबाडा धावचित (महेंद्रसिंह धोनी) १, मोर्ने मॉर्केल नाबाद ०. अवांतर ६, एकूण ५० षट्‌कांत ८ बाद २६९ धावा. गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १०/१७/१/१७, जसप्रीत बुमराह १०/०/५६/१, हार्दिक पंड्या ७/०/४१/०, युजवेंद्र चहल १०/०/४५/२, कुलदीप यादव १०/०/३४/३, केदार जाधव ३/०/१९/०.
भारत ः रोहित शर्मा झे. क्वींटन दी कॉक गो. मोर्ने मॉर्केल २०, शिखर धवन धावचित (आयदेन मारक्रम) ३५, विराट कोहली झे. कागिसो रबाडा गो. आंदिले पेहलुक्वायो ११२, अजिंक्य रहाणे झे. इम्रान ताहिर गो. आंदिले पेहलुक्वायो ७९, हार्दिक पंड्या नाबाद ३, महेंद्रसिंह धोनी नाबाद ४ धावा. अवांतर ः ७. एकूण ४५.३ षट्‌कांत ४ बाद २७०. गोलंदाजी ः गोलंदाजी ः मोर्ने मॉर्केल ७/०/३५/१, कागिसो रबाडा ९.३/०/४८/०, ख्रिस मॉरिस ७/०/५२/०, इम्रान ताहिर १०/०/५१/०, आंदिले पेहलुक्वायो ८/०/४२/२, जेपी ड्यूमिनी २/०/१६/०, आयदेन मारक्रम २/०/२०/०.