विधिमंडळ वार्तांकनासाठीच्या अटी शिथिल करण्यास तयार

0
75

>> सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही

विधानसभा कामकाजाच्या वार्तांकनाबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे जाचक वाटत असतील व त्यासंबंधी वृत्तपत्र सल्लगार समिती अथवा पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी यांनी चर्चा केल्यास त्यातील काही अटी शिथिल करणे शक्य असल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

विधानसभेतील पत्रकार गॅलरीत प्रवेश करण्यासाठी पास देण्यास आम्ही जी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत ती पत्रकारांना लक्ष्य करण्यासाठी नसून जे खरेखुरे पत्रकार आहेत त्यांना पास दिले जातील, असे आश्‍वासन काल सभापती प्रमोद सावंत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिले.

भाजपकडून मुस्कटदाबी ः कॉंग्रेस
पणजी (प्रतिनिधी) ः विधानसभेच्या वृत्तांकनासाठी प्रसार माध्यमांसाठी तयार केलेल्या जाचक अटी लोकशाही आणि भारतीय घटनेच्या विरोधात आहेत. या अटींच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याची प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी काल केला.