विधानसभेसाठी गोसुमं सज्ज

0
99
पत्रकार परिषदेत बोलताना गोसुमंचे गोवा युवा प्रमुख नितिन फळदेसाई. साबेत नूतन कार्यकारिणी समिती.

वास्को (न.प्र.)
गोवा सरकारला अर्धांगवायू झाला असून गोव्याचे राजकारण डळमळीत झाले आहे. तेव्हा २०१९ या वर्षांत लोकसभा निवडणूकी बरोबर विधानसभा निवडणूका होणे कमप्राप्त आहे. त्यानुसार गोवा सुरक्षामंचने आपली निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून विधानसभा निवडणुकीसाठी गोसुमं सज्ज असून गोसुमं आपले एकूण ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मंचाचे गोवा युवा प्रमुख नितिन फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोसुमंतर्फे दाबोळी मतदारसंघ कार्यकारिणी समिती निवडण्यात आली. समिती जाहीर करण्यासाठी बोलण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. यावेळी दाबोळी मतदारसंघासाठी निवडलेली समिती सदस्य उपस्थित होते. फळदेसाई पुढे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री आजारी असून त्यासाठी लवकरात लवकर दुसरा मुख्यमंत्री आणून गोव्याची झालेली वाताहात जाग्यावर आणणे अत्यंत गरजेचे आहे.
चिखली येथे जनतेच्या सेवेसाठी नव्याने बांधण्यात आलेले इस्पितळ लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. हे इस्पितळ लवकरात – लवकर जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित न केल्यास गोवा सुरक्षा मंच धरणे आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी श्री. फळदेसाई यांनी दिला. दरम्यान, गोसुमंतर्फे दाबोळी मतदारसंघात निवडण्यात आलेली कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष पुंडलीक भोसले, उल्हास देसाई, दयानंद मोरजकर, सचिव दीपक काणकोणकर, सहसचिव गुरू नागवेकर, युवा प्रमुख संकेत पराष्ठेकर, सहयुवा प्रमुख यादेष परब. महिला प्रमुख नीलिमा वेर्णेकर, सदस्य सिद्धार्थ नाईक, शिवा नाईक, अनंत गावस, कार्यकारिणी समितीचे यावेळी नितिन फळदेसाई यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.