विजय मल्ल्याला दणका

0
90

>> भारतीय बँकांचा दीड अब्ज पौंडस्‌चा दावा न्यायालयाकडून वैध

भारतातील अनेक बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या याला तेथील न्यायालयाने धक्का दिला आहे. भारतीय बँकांनी मल्ल्याच्या विरोधात दाखल केलेला दीड अब्ज डॉलर्स रकमेचा दावा या न्यायालयाने वैध ठरवला आहे. दरम्यान, दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने कालच मल्ल्याची भारतातील मालमता गोठवण्याचा निर्णय देऊन पुढील सुनावणी ५ जुलैला ठेवली आहे.

मल्ल्या याने भारतातील अनेक बँकांना हजारो कोटींचा गंडा घातल्याचे या बँकांनी याआधीच स्पष्ट केले होते. आता इंग्लंडमधील न्यायालयाने या बँकांचा वरील रक्कमेचा दावा वैध ठरवल्याने मल्ल्यावर तो मोठा धक्का ठरला आहे.
इंग्लंडमधील न्यायालयाच्या या निकालावर मल्ल्याच्या वकिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय मल्ल्या याला १८ एप्रिल २०१७ रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी त्याची सुटका करण्यात आली होती. ६ लाख ५० हजार पौंडस्‌च्या जामीनावर त्याला सोडण्यात आले होते.