विजय मल्ल्याला अटक व सुटका

0
117

भारतात बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र, न्यायालयात हजर केले असता त्याची त्वरित जामिनावर सुटका करण्यात आली. ब्रिटिश पोलिसांनी ही कारवाई केली.
किंगफिशर उद्योग समूहाचे मालक विजय मल्ल्यावर देशातील विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. यापूर्वी मल्ल्याला १८ एप्रिल रोजी स्कॉटलंड यार्डने अटक केली होती.