विंडीजचे सिसिल राईट ८५व्या वर्षी निवृत्त

0
106

>> खात्यात तब्बल ७००० बळींची नोंद

वेस्ट इंडीजच्या सिसिल राईट यांनी वयाच्या ८५व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा काल केली. मंगळवार ७ सप्टेंबर रोजी ते आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. राईट यांनी जमैकाकडून बार्बेडोसविरुद्ध वेस हॉल, कॉली स्मिथ, सेमूर नर्स यांच्यासारख्या दिग्गजांसोबत प्रथमश्रेणी सामना खेळला होता. या सामन्यात राईट यांनी दोन्ही डावांत मिळून ६६ चेंडूंत ४१ धावा मोजून एकही गडी बाद करता आला नव्हता. जमैकाने हा सामना ६ धावांनी जिंकला होता. १९५९ साली त्यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर तीन वर्षांनी सेंट्रल लंकेशायर लीगमध्ये क्रॉम्प्टन संघाकडून व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. राईट यांनी ६० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत ७००० बळी घेतले आहेत. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी पाच सत्रांत २७च्या सरासरीने तब्बल ५३८ बळीदेखील त्यांनी घेतले होते. मंगळवार ७ रोजी पेन्नेने लीगमध्ये अपरमिल संघाकडून स्प्रिंगहेड संघाविरुद्ध ते आपला शेवटचा सामना खेळतील.