विंडीजचा लंकेवर एका डावाने विजय

0
107

वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा एक डाव व २२६ धावांनी पराभव करत पहिला कसोटी सामना जिंकला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४५३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २२६ धावांत आटोपला.

चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ३ बाद १७६ अशी मजल मारली होती. कुशल मेंडीस ९४ धावा करून नाबाद होता. त्यामुळे लंकेच्या संघाकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु, शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच मेंडीसने तंबूचा रस्ता धरला. विंडीजकडून दुसर्‍या डावात रॉस्टन चेज याने १५ धावांत ४, देवेंद्र बिशूने ४८ धावांत ३, गेब्रियलने ५२ धावांत २ व होल्डरने १ गडी बाद केला. विंडीजने आपला पहिला डाव ८ बाद ४१४ धावांवर घोषित केला होता. तर लंकेला पहिल्या डावात १८५ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. विंडीजने आपला दुसरा डाव ७ बाद २२३वर घोषित करत लंकेला चारशेपार लक्ष्य दिले होते. मालिकेतील दुसरा सामना १४ जूनपासून ग्रॉस आयलेट येथे होणार आहे.