वाहन कायद्याची कार्यवाही केंद्राच्या निर्देशानुसार ः माविन

0
115

राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना गुजरात मॉडेलचे अनुकरण केले जाणार नाही. तर, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ३१ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल दिली.

राज्य सरकारने नवीन मोटर वाहन कायद्यातील शुल्कात बदल करू नये, असे मत ऍटर्नी जनरल ऑफ इंडिया यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा सरकार शुल्कात कपात करणार नाही. केंद्र सरकारच्या जारी केलेल्या निर्देशाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन मोटर वाहन कायद्यात विविध वाहन नियमभंग दंडाच्या रक्कमेत दहापट वाढ करण्यात आलेली आहे. नियमांचे पालन व्हावे याच उद्देशाने दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली आहे, रस्ता वाहतुकीमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.