वाहतूक खात्याच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना

0
57

वाहतूक खात्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी वाहतूक समन्वय समिती स्थापना केली आहे.
या समितीच्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या पहिली बैठकीत प्रवासी बसवाहतुकीतील विविध प्रश्‍नावर विचारविनिमय करण्यात आला आहे. प्रवासी बसवाहतुकीत सुधारणेवर भर देण्यात आला आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक, बेकायदा बस थांबे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
बसगाड्यांच्या वेळापत्रकावरून वरच्यावर भांडणे, चकमकी होण्याचे प्रकार घडतात. या समितीकडून विविध प्रवासी मार्गावरील बसगाड्यांच्या वेळापत्रकाचा फेरआढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. समितीमध्ये वाहतूक खाते, कदंब महामंडळ आणि खासगी बसमालकांचा समावेश आहे. बैठकीला वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई, कदंबचे संजय घाटे, खासगी बसमालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर व इतरांची उपस्थिती होती.