वास्कोतील गरबा, दांडिया कार्यशाळेचा समारोप

0
124
प्रशिक्षणर्थिंसह संजय सातार्डेकर, रामानंद रायकर, मोहन डिचोलकर, सुदेश भोसले व इतर.

वास्को (न. प्र.)
लोककलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असल्याने लोककलेची जपणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी केले. रवींद्र भवन बायणातर्फे आयोजित गरबा, दांडिया कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी सदस्य नोएला रॉड्रिग्ज, प्रसाद प्रभुगावकर, सुदेश भोसले, मोहन डिचोलकर, रामानंद रायकर, दांडिया गरबा प्रशिक्षक उमेश फटजी उपस्थित होते.
गेले आठ दिवस चाललेल्या या कार्यशाळेत ८७ महिला, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोप सोहळ्यात गरबा, दांडियाचे सादरीकरण केले. या कार्यशाळेला सुचिता नाईक, रिमा मेस्ता यांचेही सहकार्य लाभले. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. शेवटी सडा येथील संयोगम कला संघाने गरबा, दांडिया नृत्ये सादर केली.