वन-मावळींगे पंचायत कोसळली

0
216

मये मतदारसंघातील वन मावळींगे पंचायत इमारतीचा एक भाग काल रविवारी रात्री कोसळल्याने मोठी हानी झाली असून सुदैवाने रात्री कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला.

या पंचायतीची इमारत मोडकळीस आली होती. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रवीण झांटये यांनी पाहणी करून सरकारला माहिती दिली होती. सदर इमारतीचे छप्पर व भिंती धोकादायक बनल्या होत्या. रविवारी तलाठी बसत असलेल्या खोलीचे छप्पर व भिंती पडल्याने आतील सर्व वस्तू तसेच दस्तऐवजाचे नुकसान झाले आहे. माजी सरपंच मधू नाईक, इतर पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी धाव घेऊन पाहणी केली. तलाठ्यांची खोली पूर्ण उद्ध्वस्त झाली असून इमारतीचा अन्य भागही कोसळण्याची भीती आहे. या इमारतीच्या बाजूनेच एक लहान पायवाट असून तेथून लोकांची वर्दळ असते. परंतु रात्री कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला अशी माहिती मधू नाईक यांनी दिली.

आमदार झांटये यांना दुर्घटनेची कल्पना देताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. पंचायत इमारतीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, जागेचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने काम रखडले आहे. यावर आता सरकारने तोडगा काढावा असे आमदार झांटये म्हणाले.