लॉकडाऊनचा क़ालावधी वाढवण्याचा सध्या तरी विचार नाही ः केंद्र सरकार

0
150

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. मात्र केंद्र सरकारने यावर नकार दर्शवत सामान्यांना दिलासा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवण्याची कोणतीही योजना नाही, असे सध्या तरी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबद्दल सरकारचा विचार नसल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दि. २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनचे सहा दिवस पूर्ण झाले आहेत.

भारतात देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झाली ११२२ वर पोहचली आहेै. तर कोरोनामुळे ३० जणांनी आपले प्राण गमावलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीची साधने नसल्याने  पायीच आपल्या घराकडे निघालेल्या हातावर पोट असलेल्यांच्या निवासाची व खाण्याची सोय करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिलेले आहेत.