‘लाडली’साठी वयात सवलतीचा विचार

0
93

स्त्री भ्रूण हत्या घटल्याचा दावा
४० वर्षेपर्यंत वयाच्या मुलींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेता येतो. लग्न करण्याची इच्छा असलेल्या अशा मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी सहा महिन्यांची सवलत देण्याचा सरकार विचार करीत असल्याचे महिला आणि बाल विकासमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल विधानसभेत आपल्या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले.
गृह आधार योजनेखाली १ लाख १३ हजार ७३७ गृहिणींना प्रत्येकी १२०० रु. या प्रमाणे मदत दिल्याचे परूळेकर यांनी सांगितले. लाडली लक्ष्मी योजनेखाली १७ हजार ८६ जणांना प्रत्येकी १ लाख रुपये मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. लाडली लक्ष्मी योजनेमुळे राज्यातील स्त्री भृणहत्येचे प्रमाण कमी झाल्याचे परूळेकर यांनी सांगितले. यापूर्वी एक हजार मुलांमागे ९४० मुलींच्या जन्माचे प्रमाण होते. आता हे प्रमाण ९६९ झाल्याची माहिती त्यांनी दिली.