लाचप्रकरणी आणखी एका पंचाला अटक

0
139

दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने हॉटेल व्यावसायिकाकडून लाचप्रकरणी हणजूण कायसूव पंचायतीच्या आणखी एका पंच सदस्याला काल अटक केली असून सुरेंद्र गोवेकर असे अटक केलेल्या पंच सदस्यांचे नाव आहे.

एसीबीने या प्रकरणी हणजूण पंचायतीचे पंच सदस्य हनु’ंत गोवेकर याला शनिवारी अटक केली आहे. दरम्यान, दोघाही पंच सदस्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला. या प्रकरणातील सहभागी आणखी एक पंच सदस्य शीतल दाबोलकर फरारी असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

हणजूण पंचायत क्षेत्रातील एका हॉटेल प्रकल्प बेकायदा असल्याचे हॉटेल मालकाला सांगून तीन पंचायत सदस्यांनी प्रकल्प कायदेशीर करण्यासाठी २० लाख रुपये लाच मागितली होती. या प्रकरणी हॉटेल मालक व पंच यांनी अंतिम रक्कम निश्‍चित करून रक्कम हप्ता – हप्त्याने देण्याची निश्‍चित केले होते. या प्रकरणी हॉटेल मालकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून लाचेच्या रक्कमेतील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पंच सदस्य हनुमंत याला रंगेहात पकडले होते.