लंडनमधील दहशतवादी हल्ल्यात ७ ठार; ४८ जखमी

0
71

आत्मघाती हल्लेखोरांच्या बनावट वेषात असलेल्या सुरेधारी तीन दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री लंडन शहराच्या दोन वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी जमावात घुसून अनेक लोकांना बेभानपणे सुर्‍यांनी भोसकल्याने त्यातील ७ जण ठार झाले. तसेच ४२ जण जखमी झाले. लंडन पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी नंतर तिघाही हल्लेखोरांना ठार केले. मात्र या हल्ल्याची जबाबदारी कोणाही संघटनेने घेतलेली नाही. यावर्षी ब्रिटनमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे.