रोहित, बुमराहची निवड

0
83

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश करून १२ सदस्यीय संघ निवडला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या केवळ दोघांना स्थान मिळाले आहे. जेसन रॉय आणि रोहित शर्मा यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विल्यमसनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे, तर उपविजेत्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि बांगलादेशच्या एका खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे.

आयसीसी संघ ः जेसन रॉय (इंग्लंड), रोहित शर्मा (भारत), केन विल्यमसन (न्यूझीलंड), ज्यो रूट (इंग्लंड), शाकिब अल हसन (बांगलादेश), बेन स्टोक्स (इंग्लंड), आलेक्स केरी (ऑस्ट्रेलिया), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) व जसप्रीत बुमराह (भारत).